Thursday, June 26, 2008

कोकण- परशुरामाची भूमी

सगळॆ जण मराठी भाषा वाचवुच्या मागावर असत. आता जर मराठीचोच प्रसार करुचो लागता हा तर मगे मालवणीची काय कथा तीचो कोण वाली उरतलो. तो एक मच्छीन्द्र काम्बळी होतो.. तोव रवलो नाय. त्याना मालवणी नाटका काढुन भाषेचो प्रसार केल्यान. आता मालवणी लोकान्काच मालवणीचो प्रसार करुक व्ह्ययो। तेच्यासाठीच ह्यो प्रपन्च करतय. रोज थोडातरी मालवणीत लिहुचा असा ठरवलय...

मालवणी ही कोकण प्रान्ताची बोलीभाषा असा। थोडीफ़ार कोकणी भाषेसारखीच हा। कोकणी ही गोयात बोल्लीजाता. कोकण म्हणजे परशुरामाची भूमी. परशुरामान ही भूमी वसवली हा.
परशुराम ह्यो जमदग्नी रुषीन्चो धाकटो मुलगो. त्यान्का तीन मुलगे. जमदग्नी रूषीन्ची पत्नि खूप पतीव्रता होती. ती एवढी पुण्यवान की पतीला पूजेक लागणारा पाणी ती पदरातून हाणी. एकदा ती नदीवर गेल्ली असता थय गन्धर्व पण इले होते. तेव्हा तीच्या मनाकडे फ़क्त इला की किती सुन्दर असत. बस॥ येवढाच कारण आणी तीच्या पदरात पाणी येइना. इकडे जमदग्नी रूषीनी ही अजुन कशी इली नाय म्हनुन ध्यान लावल्यानी. आणी त्यान्का सगळा समजला. पत्नी रिकाम्या हातान घरी इली. रूषीनी आपल्या पयल्या मुलाक आद्न्या केल्यानी कि हिचो शीरच्छेद कर. मात्रुहत्येचा पाप लागात म्हणून तो तयार होइना. दुसरो मुलगोव असोच तयार होइना. तेव्हा त्यानी परशुरामाक आद्न्या केली. परशुरामाने आइची माफ़ी मागुन तीचो शीरच्छेद केलो. जमदग्नी तेच्यावर प्रसन्न झाले नी त्यानी त्याका वर मागुक सान्गल्यानी. तेव्हा परशुरामान आइक आणि भावान्का परत जिवन्त करुन घेतल्यान. पण मात्रुह्त्येचा पाप त्याका लागला ता लागलाच. असे म्हणतत की ता पाप परशुरामाच्या ह्या भूमीकव लागला हा. म्हणुन कोकणाचो विकास होत नाही हा. पण आता सरकारने कोकणाचो विकास करुचो मनावर घेतल्यान हा बघु आता काय होता ता...

No comments: