Monday, June 23, 2008

भजन

माझी आज्जी एक खुप गोड भजन म्हणायची ॥ खुप जुने भजन आहे ते आणि त्याची चाल पण एवढी गोड आहे ना ॥
आवडीने भावे हरी नाम घेसी , तुझी चिंता त्यासी सर्व आहे ।। दृ ॥
ठेविले अनंते तैसेची रहावे , चित्ती असो द्यावे समाधान ।
राहिल्या उदेवेग दुखची केवल , भोगणेटी ते फळ संचिताचे
नको खेद करू कोणत्या गोष्टीचा , पति लक्ष्मीचा जानतसे।
सकल जीवांचा करितो साम्भाल, तुज मोकलिल ऐसे नाही
जैसी स्थिति आहे , तैशापरी राहे, कौतुक तू पाहे संचिताचे।
एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा , हरी कृपे त्याचा नाश आहे॥
छानआहे न रोज तुम्हीही हे गाऊ शकता

1 comment:

पुण्याचे पेशवे said...

छान अभंग.. धन्यवाद इथे लिहून उपलब्ध करून दिल्याबद्दल.