Thursday, June 19, 2008

वेंगुर्ले - आख्यीका

खुप खुप वर्षांपूर्वी वेंगुर्ले हे गाव अस्तित्वात नव्हते। या गावापासून जवलचअसलेल्या अनसुर या गावी श्री सातेरी देवीचे मन्दिर होते। हे मन्दिर मूल भूमिकेचे मन्दिर म्हणुन ओलखले जाई । या मंदिराचे सर्व अधिकार हे परब आणि गावडे या कुतुम्बंकडे होते। तर या परब कुतुम्बमाधिल एक श्रद्धालु नेहेमी दहा दहा मैल चालत देवीच्या दर्शनाला जाई। वृधाप्कालाताही त्याने हा शिरस्ता मोडला नाही । त्याच्या भक्तिवर श्री सातेरी देवी प्रसन्न झाली आणि तीने त्याला दृशांत देऊन आश्वासन दीले की ती त्याच्या घराजवल येउन राहील।
तो श्रद्धालु भक्त पुन्हा आपल्या घरी निघाला तेव्हा त्याला आपल्या घराजवल एक पाषाणजमिनीपासून उगवताना दिसला आणि तो पाषाण आकाराने वाढतच होता। तेव्हा या परबाने त्या पाषानाला घट्ट मिठी मारली आणि देवीला गाराने घातले की त्याने देवीला ओलखले आहे नि आता तिने वाढायचे थाम्बवावे आणि येथेच वास्तव्य करावे। हेच ते स्थान आहे जे आता श्री सातेरी देवीचे स्थान म्हणुन ओलखले जाते।
या अख्यायिके वरून या गावाला वेंगुर्ले हे नाव मिळाले। या गावाची बोलीभाषा मालवणी , तर मालवनित वेंग म्हणजे मिठी आणि उरले म्हणजे उरलेले । वेंगेत उरलेले म्हणुन वेंगुर्ले।
तर असे हे माझे गाव जे अस्तित्वातच आले मुळी परबाच्या श्री सातेरी देवी वरील भक्तिमुले आणि देवीच्या आशिर्वदामुले।
या गावावर असलेला देवीचा वरद हस्त येथील निसर्ग समृधतेतुं जाणवतो। येथे पिकनारे काजू सुप्रसिद्ध आहेत।
या गावावारिल डच संस्कृतीचा प्रभाव जागोजागी जाणवतो । येथे डच लोकानी वसाहत केलि होती। त्यानी या गावत बर्याच सुधारना केल्या। त्यानी बांधलेले मार्केट खुपच चान आणि प्रशस्त आहे। येथे सर्व प्रकारच्या वस्तु , ताजा भाजीपाला, काजू, काजुचे वेग वेगले प्रकार विकायला ठेवलेले मिलातात। ओले काजू, सुके काजू। भाजलेले काजू। मीठ लावलेले काजू। मसाला काजू आणि बरेच काही।
वेंगुर्ले बंदरावर एकदम ताज़ी आणि मोठी मासली अगदी स्वस्त दरात मिलते। वेंगुर्ल्याचा समुद्र किनारा खुपच नयनरम्य आहे। त्यासाठी इथे एकदा यावेच लागेल।
आणि ही बरेच काही लिहिण्या सारखे आहे पण ते सर्व पुड्च्या भागात
आता आवरते घेते।

2 comments:

vainatai said...

sateri mazi gramdevata tasech kuldevata aahe. Sateri devibaddal mahiti lihily baddla THANKS.

Unknown said...

vengurla baddal mala abhiman ahe
karan vengurla maza taluka ahe

jai vengurala
satej d
hodavade