Thursday, June 19, 2008

लग्न

असे म्हणतात की लग्न पाहावे करून । लग्न म्हणजे दोन जीवांचे मिलन। दोन कुतुम्बानचा सम्बन्ध । आणि बरेच काही । आता लग्न या विषयावर मी बापडी काय बोलणार ॥ पण लग्न करण्याच्या बाबतीत मी एवढे काही टक्के तोपने खाल्ले आहेत की बस रे बस ।
आधी लग्नाच्या बाजारात स्वताला नित प्रेजेंट करा त्यासाठी वेग वेगळ्या पोज़ मध्ये फोटो काढा मग स्वत बद्दल निबंध लिहा। वेग वेगळ्या मंडलातन नाव नोंदवा सर्व नातेवईकानकड़े बायो डेटा दया
मग एक एक जन स्थल सुचावानार । पण सुचवताना ते स्थल ज़रा तरी जूलनारे असावे पण नाही बरेकाही बोलावे तर बोलणार मुलीची जात कुठेतरी एडजस्ट करावेच लागणार म्हणजे काय मुलीने अपेक्षाच ठेऊ नए

आता माझे लग्न अजुन नाही झाले तर लोकाना याचा काय बरे त्रास व्हावा । लग्न म्हणजे अशी गोष्ट आहे की एखाद्याच्या लग्नाचा समाजाला ना काही फायदा होत ना काही तोटा पण याच समाजाला प्रत्येकाच्या लग्नाची भारी चिन्ता असते। जर कोणी गैर काम करत असेल तर कोणी जाउन त्याला विचारत नाही की का रे बाबा असे का करतो असे करू नए कोणी भ्रष्टाचार करत असेल तर त्याचा समाजावर परिणाम होतो पण कोणी जाउन भर रस्त्यात त्याला कोणी विचरते का की काय म्हणुन तू पैसे खातोस पण जर एखाद्याचे लग्न झाले नसेल तर हां समाज हात धू उन त्याच्या मागे लागतो। येता जाता , कुठेही रस्त्यात विचारणार मग लग्न कधी करताय लग्न बिग्न करायचे आहे की नाही आणि जर का मुलीचे लग्न होत नसेल तर मग काही विचारू नका हा हिचिच नाटके असणार आणि अशा कमेंट्स मला माझ्या जन्रेशंच्या मुलान कडून च मिलाल्या आहेत हे आशार्य असो आता माझे लग्न होईपर्यंत ये दुनिया मुझे चैनसे जीने नही देगी

No comments: