Saturday, July 3, 2010

Back to Blog

Today is special day. After around an year I am back to blogging. Writing in English and not in Marathi because yet to install Marathi Editor. I know nobody would have missed me.... but i missed it myself....
Lets see this time how it goes....
Sai Sateri Shiv Ganesh

Monday, July 28, 2008

गटारी

आषाढी अमावस्येला गटारी अमावस्या असेही म्हणतात। आषाढानन्तर येणारा श्रावण पाळला जातो. या महीन्यात मान्साहार वर्ज्य असतो. आणि म्हणुन मान्साहारी लोक गटारी अमावस्येला मासे-मटण खाउन घेतात.
आम्ही आम़ची गटारी या रविवारीच साजरी केली. जेवणात वडे- सागोती , आम्बोळी, सोलकढी, गरमागरम भात . कान्दा, लिम्बु , टोमटो असा मस्त बेत होता. ताट पाहून तोन्डाला पाणी सुटले ना!

Sunday, July 27, 2008

अलिबागची सहल

खूप दिवसानी सहलीला जायचा योग जुळुन आला। जवळच अलिबागला जायचे ठरले। आम्ही तीस- चाळीस जण होतो। सकाळी सहा वाजता दादरला भेटायचे होते। पाऊस तर अगदी मी म्हणत होता। मला तर वाटले सहल रद्द होते बिते की काय॥ पण सगळ्याचे इरादे अगदी पक्के होते। आणि आम्ही बसमध्ये बसलो।
जाताना निसर्ग सौद्र्य काय बघाल॥ सगळीकडे हिरवळच हिरवळ. जिकडे पाहावे तिकडे हिरवाई पसरलेली त्यात पावसाची सन्तत धार.. एकूणच वातावरण एकदम रोमान्टीक होते. साधारण साडे अकरा वाजता आम्ही आवास बीचवर पोहोचलो. तिथे आमची सोय एम. टि. डी. सी. च्या होलीडे होम मध्ये करण्यात आली होती. आम्ही पोहे आणि चहा पीऊन समुद्रावर निघालो. किनारयावर खूप मस्ती केली. पाण्यात डुम्बलो. वेळ कसा गेला कळलेच नाही. आता पोटात कावळे ओरडायला सुरूवात झाली होती. पण समुद्रावरून पाय निघेना. दुपारचे तीन वाजले होते. आणि सडकून भूकही लागली होती. जेवणावर मस्त ताव मारला. साधारण चार वाजता परतीच्या प्रवासाला निघालो. आणि रात्री मुम्बइला पोहोचलो.Thursday, July 17, 2008

गुरुपौर्णिमा


आज गुरुपौर्णिमा... आपल्या गुरुचे स्मरण करण्याचा दिवस.... त्यान्च्या बद्दल क्रुतद्न्यता व्यक्त करन्याचा दिवस... हि पौर्णिमा व्यासपौर्णिमा म्हणूनही ओळखली जाते।

आपण जीवनात प्रत्येकाकडून काही ना काही शिकत असतो। आणि प्रत्येकाकडे काहितरी शिकण्यासारखे असते. त्या प्रत्येकाला आपण गुरू मानले पाहीजे. मी माझ्य़ा त्या सर्व गुरुना प्रणाम करते. तसेच माझे गुरु श्री काडसिधेश्वर महाराजाना प्रणाम करते. मी माझ्या परमप्रिय साईनाथ गुरूना नमन करते.माझ्या शालेय आणि महाविद्यालयीन जीवनातील सर्व शिक्शकाना प्रणाम करते.

जय गुरु देव:श्री सत्चिदानन्द सद्गगुरू साईनाथाय नम:


Thursday, June 26, 2008

कोकण- परशुरामाची भूमी

सगळॆ जण मराठी भाषा वाचवुच्या मागावर असत. आता जर मराठीचोच प्रसार करुचो लागता हा तर मगे मालवणीची काय कथा तीचो कोण वाली उरतलो. तो एक मच्छीन्द्र काम्बळी होतो.. तोव रवलो नाय. त्याना मालवणी नाटका काढुन भाषेचो प्रसार केल्यान. आता मालवणी लोकान्काच मालवणीचो प्रसार करुक व्ह्ययो। तेच्यासाठीच ह्यो प्रपन्च करतय. रोज थोडातरी मालवणीत लिहुचा असा ठरवलय...

मालवणी ही कोकण प्रान्ताची बोलीभाषा असा। थोडीफ़ार कोकणी भाषेसारखीच हा। कोकणी ही गोयात बोल्लीजाता. कोकण म्हणजे परशुरामाची भूमी. परशुरामान ही भूमी वसवली हा.
परशुराम ह्यो जमदग्नी रुषीन्चो धाकटो मुलगो. त्यान्का तीन मुलगे. जमदग्नी रूषीन्ची पत्नि खूप पतीव्रता होती. ती एवढी पुण्यवान की पतीला पूजेक लागणारा पाणी ती पदरातून हाणी. एकदा ती नदीवर गेल्ली असता थय गन्धर्व पण इले होते. तेव्हा तीच्या मनाकडे फ़क्त इला की किती सुन्दर असत. बस॥ येवढाच कारण आणी तीच्या पदरात पाणी येइना. इकडे जमदग्नी रूषीनी ही अजुन कशी इली नाय म्हनुन ध्यान लावल्यानी. आणी त्यान्का सगळा समजला. पत्नी रिकाम्या हातान घरी इली. रूषीनी आपल्या पयल्या मुलाक आद्न्या केल्यानी कि हिचो शीरच्छेद कर. मात्रुहत्येचा पाप लागात म्हणून तो तयार होइना. दुसरो मुलगोव असोच तयार होइना. तेव्हा त्यानी परशुरामाक आद्न्या केली. परशुरामाने आइची माफ़ी मागुन तीचो शीरच्छेद केलो. जमदग्नी तेच्यावर प्रसन्न झाले नी त्यानी त्याका वर मागुक सान्गल्यानी. तेव्हा परशुरामान आइक आणि भावान्का परत जिवन्त करुन घेतल्यान. पण मात्रुह्त्येचा पाप त्याका लागला ता लागलाच. असे म्हणतत की ता पाप परशुरामाच्या ह्या भूमीकव लागला हा. म्हणुन कोकणाचो विकास होत नाही हा. पण आता सरकारने कोकणाचो विकास करुचो मनावर घेतल्यान हा बघु आता काय होता ता...

Wednesday, June 25, 2008

केकावली

माझ्या आईने आम्हाला एक छान कविता शिकवली आहे. मयुरपन्तान्ची केकावली म्ह्नणून ती प्रसिद्ध आहे.बहुतेक जणाना केवळ पहिली ओळ माहीत असावी.
सुसन्गती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो ।
कलन्क मतीचा झडॊ विशय़ सर्वथा नावडॊ ॥
सद्न्ग्री कमळी दडॊ मुरडीता हटाने अडॊ ।
वियोग घडता रडॊ मन भव: चरीत्री जडॊ ॥
न निश्चय कधी धळॊ कुजन विघ्न बाधा टळॊ ।
न चित्त भजनी चळो मतिस्दुक्त मार्गी वळो ॥
स्व तत्व ह्र्दया कळॊ दुरभीमान सारा गळॊ।
पुन्हा न मन हे मळॊ दुरित आत्म बोधे जळॊ॥

Monday, June 23, 2008

फुलांची दुनिया

आमच्या झाडाला आलेल्या फुलांचे फोटो ....

ही लिली ची फूले आहेत

फुलांचा राजा गुलाब शोभतो खरा