Monday, July 28, 2008

गटारी

आषाढी अमावस्येला गटारी अमावस्या असेही म्हणतात। आषाढानन्तर येणारा श्रावण पाळला जातो. या महीन्यात मान्साहार वर्ज्य असतो. आणि म्हणुन मान्साहारी लोक गटारी अमावस्येला मासे-मटण खाउन घेतात.
आम्ही आम़ची गटारी या रविवारीच साजरी केली. जेवणात वडे- सागोती , आम्बोळी, सोलकढी, गरमागरम भात . कान्दा, लिम्बु , टोमटो असा मस्त बेत होता. ताट पाहून तोन्डाला पाणी सुटले ना!

Sunday, July 27, 2008

अलिबागची सहल

खूप दिवसानी सहलीला जायचा योग जुळुन आला। जवळच अलिबागला जायचे ठरले। आम्ही तीस- चाळीस जण होतो। सकाळी सहा वाजता दादरला भेटायचे होते। पाऊस तर अगदी मी म्हणत होता। मला तर वाटले सहल रद्द होते बिते की काय॥ पण सगळ्याचे इरादे अगदी पक्के होते। आणि आम्ही बसमध्ये बसलो।
जाताना निसर्ग सौद्र्य काय बघाल॥ सगळीकडे हिरवळच हिरवळ. जिकडे पाहावे तिकडे हिरवाई पसरलेली त्यात पावसाची सन्तत धार.. एकूणच वातावरण एकदम रोमान्टीक होते. साधारण साडे अकरा वाजता आम्ही आवास बीचवर पोहोचलो. तिथे आमची सोय एम. टि. डी. सी. च्या होलीडे होम मध्ये करण्यात आली होती. आम्ही पोहे आणि चहा पीऊन समुद्रावर निघालो. किनारयावर खूप मस्ती केली. पाण्यात डुम्बलो. वेळ कसा गेला कळलेच नाही. आता पोटात कावळे ओरडायला सुरूवात झाली होती. पण समुद्रावरून पाय निघेना. दुपारचे तीन वाजले होते. आणि सडकून भूकही लागली होती. जेवणावर मस्त ताव मारला. साधारण चार वाजता परतीच्या प्रवासाला निघालो. आणि रात्री मुम्बइला पोहोचलो.











Thursday, July 17, 2008

गुरुपौर्णिमा


आज गुरुपौर्णिमा... आपल्या गुरुचे स्मरण करण्याचा दिवस.... त्यान्च्या बद्दल क्रुतद्न्यता व्यक्त करन्याचा दिवस... हि पौर्णिमा व्यासपौर्णिमा म्हणूनही ओळखली जाते।

आपण जीवनात प्रत्येकाकडून काही ना काही शिकत असतो। आणि प्रत्येकाकडे काहितरी शिकण्यासारखे असते. त्या प्रत्येकाला आपण गुरू मानले पाहीजे. मी माझ्य़ा त्या सर्व गुरुना प्रणाम करते. तसेच माझे गुरु श्री काडसिधेश्वर महाराजाना प्रणाम करते. मी माझ्या परमप्रिय साईनाथ गुरूना नमन करते.माझ्या शालेय आणि महाविद्यालयीन जीवनातील सर्व शिक्शकाना प्रणाम करते.

जय गुरु देव:श्री सत्चिदानन्द सद्गगुरू साईनाथाय नम: